Back to Prayers

भीम स्तुति (Bhim Stuti)

A prayer in praise of Dr. B.R. Ambedkar

दिव्य प्रभरत्न तू साधू वरदान तू आद्य कुल भूषण तू भीमराजा ।।१।। सकल विद्यापति, ज्ञान सत्संगति, शास्त्र शासनमति, बुद्धी तेजा ।।२।। पंकजा नरवरा, रत स्वजन उद्धरा, भगवंत आमुचा खरा, भक्तकाजा ।।३।। चवदार संगरी शस्त्र न धरिता करी, कांपला अरी उरी, रोद्र रूपा ।।४।। मुक्ती पथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता, उजाळीला अगतिका, मार्ग साचा ।।५।। राष्ट्र घटनाकृती, शोभते भारती, महामानव बोलती, सार्थ संज्ञा ।।६।। शरण बुद्धास मी, शरण धम्मास मी, शरण संघास मी भीमराजा ।।७।।